मनातला पाउस, अंगणातला पाउस,
भुवंयाँखालच्या दोन तळ्यातला पाउस
तुझा पाउस, माझा पाउस, प्रत्येकाचा वेगळा पाउस,
युगुलांचा, पक्ष्यांचा पाउस; अंग चोरून आईला बिलगणार्य़ा वासराचा पाउस.
पण मनातला पावसापेक्षा कितीतरी वेगळा वास्तवातील पाउस,
म्हणुनच वाटतं, पुर्णब्रह्म निर्माण करण्यार्या ब्राहणाचा ही कधी असतो का पाउस?
येत नाही, बरसत नाही तोवर सगळ्यांना वाट पाहायला लावणारा पाउस,
मला, मोराला, वेली फुलांना आणि माझ्या सर्जाला ही चातक बनवणारा पाउस.
सगळेच केव्हा न केव्हा चातक बनतात, सगळ्यांनाच हुरहुर लावतो पाउस,
डोळ्यापुढे खरा चातक असुनही, मनालाच चातक बनवतो पाउस.
तुझे माहीत नाही पण माझ्या परसात आज कोसळतोय पाउस,
पुन्हा डोळ्यांपुढे, तुला, मोराला, अन माझ्या सर्जाला आणतोय पाउस.
तिच्या मनाचा अनभिषिक्त सम्राट म्हणुन मोर नाचतोय पाउस्,
कुठल्या ओल्या पानांच्या आड़ लपलीय म्हणुन कोकिळ गातोय पाउस.
नियतीच्या भीतीने झाडाला अधिकच बिलगलेल्या वेलीला डरावतोय पाउस,
कष्टात भिजलेल्या बिजवैच्या भविष्य़ाबद्द्ल सर्जाला पोखरतोय पाउस.
काहींना त्याच्या थांबण्याची ही वाट आहे--कधी थांबेल हा पाउस,
माझ्या मनातील पहाट क्षणभंगुर ठरल्याची साक्ष हा पाउस.
मोर्, कोकिळ्, आणि तुझ्या स्वप्नांना सप्तरंगात रंगवत राहील पाउस
माझ्या अन सर्जाच्या नव्या पहाटेच्या रहस्याचा राजदां पाउस

पुन्हा कदाचित तु, मोर्, कोकिळ, येणार नाहीत, पण येत राहील पाउस
फक्त अंगणातला कि भुवयांखालच्या दोन तळ्यातला, हा प्रश्न उडवत राहिल पाउस....
---रणजीत खोमणे
2 comments:
Nice poem, expresses the feelings of the farmer. Keep on writing. Good work.
-----Regards----------
---- Chetan-----------
वास्तवातला पाउस आपल्या साठी नसतोच कधी, आपण पाउस मागतो फक्त एन्जॉय करण्यासाठी ,
गलारीत बसून चटकदार भजी आनी कोफीचा घोट, बलीराजा चीन्तीतो कधी भरेल पोट,
पर्जन्य सुक्ता मधे त्याच्या दोल्यातला ओलावा हवा, नाहीतर कोरडी वाहते इकडून तीकडे हवा.
Post a Comment