आकाशाच्या रम्य पटावर स्मरते कविता
एकान्ताच्या पाणवठ्यावर स्फुरते कविता...
चैत्रपालवी, श्रावणधारा अपुल्या जागी,
वैशाखातून रंग अनोखे भरते कविता...
दंभाच्या या शर्यतीत मी सामिल होतो,
जिंकून जातो मी तेव्हा पण हरते कविता!
कधी कधी ती आईइतकी मोठी होते,
कधी प्रेयसी बनून माझी झुरते कविता.
'कुणीच' नसल्याचा झालो मी जर आरोपी,
अस्तित्वाचा एक पुरावा ठरते कविता...!
चराचरातील ईश्वर हेवा करेल ऐशी,
विश्व व्यापुनी दशांगूले वर उरते कविता...
-ज्ञानेश पाटिल
जळगाव.
Saturday, August 9, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment